Breaking News

शासनाच्या विरोधात निदर्शने करणार-आरएमपीआय

ठाणे, दि. 20, फेब्रुवारी - भारताचा क्रांतीकारी मार्क्सवादी पक्षाची (आरएमपीआय) केंद्रीय कार्यकारिणीची बैठक ठाणे येथील कॉम्रेड शामराव परूळेकर भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत 23 मार्चपासून 31 मार्चपर्यंत आठवडाभर देभभर विविध भागात भाजपा सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात व स्थानिक प्रश्‍न घेऊन जिल्हावार मोर्चे व निदर्शने क रण्याचा निर्णय घेण्यात आला.


यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कॉ. मंगतराम पासला यांनी बोलताना भाजपा सरकारविरोधात निर्दशने करण्याचा ठराव बैठकीत संमत झाल्याचे सांगितले. याबरोबर धर्मनिरपेक्ष मताच्या लोकांचा गट करून त्यांना सध्याच्या सरकारविरोधात आघाडी करण्यासाठी पक्ष प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. सध्याच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, शेतकरी यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. बेकारांची संख्या वाढत आहे, शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळे करणारे देशाबाहेर पळून जात आहेत. दलितांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. भारतीय सैन्य कोणाशीही लढण्यास जीवाची बाजी लाऊन सीमेवर आहेत अशा वेळी आरएसएसचे संघचालक मोहन भागवत सैन्याचे मनोबल कमी करून सीमेवर संघ कार्यकर्ते लढतील अशी विधाने करीत आहेत. याबरोबर केरळमधील मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष दडपशाही वापरून भारताचा क्रांतीक ारी मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करीत आहेत. एका कार्यकर्त्याची हत्या देखील सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी केली मात्र त्याचा तपास देखील लागला नाही. या सर्व मुद्यांवर पक्षाच्या बैठकीत चर्चा होऊन सरकारविरोधी तसेच विविध सामाजिक प्रश्‍नांवर पक्षातर्फे लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला.