Breaking News

आधिवेशनासाठी शिक्षकांना विशेष रजा मंजुर


अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे द्वैवार्षिक आधिवेशन पुर्व मुंबई दहिसर येथे पार पडणार आहे. या अधिवेशनासाठी शिक्षकांना उपस्थित राहता यावे याकरीता महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दि.09 ते 11 फेब्रुवारी या तीन दिवसांसाठी विशेष रजा मंजुर केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली. या रजेचे पत्र नुकतेच शिक्षक परिषदेला शासनाच्या वतीने प्राप्त झाले आहे.
दि.10 व 11 फेब्रुवारी रोजी होणार्‍या या आधिवेशनात शिक्षण विषयक अनेक विषयांवर चर्चासत्रे होणार असून, या अधिवेशनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बोडखे यांनी केले आहे.