Breaking News

21 फेब्रुवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन


अहमदनगर  - जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्‍या वतीने नगरमधील रावसाहेब पटवर्धन स्‍मारक समिती सभागृहात येत्या 21 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सहाय्यक संचालक मुकणे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

या मेळाव्‍यात नागेबाबा मल्‍टीस्‍टेट अर्बन को.ऑप सोसा. मर्यादित अहमदनगर ( 38), नवभारत फर्टीलायझर लि. औरंगाबाद ( 50), युरेका फोर्ब्‍स लि. तारकपूर अहमदनगर( 30),संजीवनी पॅकेजींग प्रा. लि. हंगा ता. पारनेर (50), मानवी नॉनफेरस व्‍हेरायटीज प्रा. लि. एमआयडीसी सुपा ता. पारनेर (5) व शोध अॅडव्‍हान्‍टेक टेक्‍नॉलॉजीस चिलखठाणा एमआयडीसी औरंगाबाद ( 27) अशी एकूण 200 रिक्‍तपदे भरण्‍यात येणार आहेत.