Breaking News

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीतही जातवैधता प्रमाणपत्र सादरीकरणास सवलत


नगर :- ग्रामपंचायत निवडणुकीसह इतर निवडणुकांमध्ये राखीव जागांवर उमेदवारी अर्ज सादर करतानाच आता जात वैधता प्रमाणपत्रच सादर करण्याच्या नियमाला सवलत देण्यात येणार आहे. मात्र, निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये पडताळणी समितीने दिलेले वैधता मार्च २०१६ ते डिसेंबर २०१७ या दरम्यान पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादरीकरणासाठी निवडणुकीनंतर ६ महिन्यांची मुदत देण्याचा शासन निर्णय झाला होता. परंतु आगामी निवडणूक डोळ्यासमोर धरून हाच निर्णय पुढील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शासनाने लागू केला आहे.

उमेदवारांना यासाठी प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हमीपत्र द्यावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने तसा आदेश दिला असून उमेदवारी अर्ज सादर करताना त्यासोबत जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा द्यावा लागणार आहे. 

जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने निवडणूक पूर्व पडताळणीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर करणार्‍यांची संख्या वाढली होती. आता मात्र उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावाची सत्यप्रत अथवा अर्ज सादर केल्याची पावती व हमीपत्र जोडल्यानंतरही उमेदवारी अर्ज भरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.