Breaking News

शिंगवे परिसरात 60 ब्रास वाळूसाठा जप्त तहसीलदार शिंदे यांची धडक कारवाई


नगर  :- तालुक्यातील शिंगवे परिसरात तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांनी वाळूतस्कारांविरोधात कारवाई करीत 60 ब्रास वाळूसाठा जप्त केलाआहे. यात वापरण्यात आलेली दोन ट्रॅक्टरही जप्त केली आहेत. यातील दोषींना सुमारे सात लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तहसीलदार शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची वाळूतस्करांविरोधात पहिलीच कारवाई असून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा जप्त करण्यात त्यांना यश आले आहे.

गावातील सरकारी जागेवर बेकायदा वाळूसाठा केला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तहसीलदार शिंदे तसेच त्यांच्या पथकातील मंडलाधिकारी दीपक कारखिले, श्रीनिवास आव्हाड, तलाठी गणेश आगळे, ज्ञानदेव बेल्हेकर यांनी छापा टाकला. पथकाने या वाळूसाठ्यांचा सरकारी दराप्रमाणे लिलाव करून सुमारे दोन लाख रुपये वसूलही केले आहेत. तसेच बेकायदेशीर कामासाठी वापरलेले दोन ट्रॅक्टरही जप्त केले आहेत.