Breaking News

महिला जिल्हा सल्लागार समितीमध्ये महिलांनी सहभागी व्हावे : माने


नगर :- महिलांसाठी हुंडा निर्मूलन, हिंसाचारापासून संरक्षण, देवदासी प्रथा निर्मूलन, अनैतिक व्यापार प्रतिबंध या सारख्या कायद्याच्या आणि महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती कार्यरत आहे. या समितीवर अशासकीय महिला सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अशासकीय महिला सदस्य निवडीसाठी पात्र महिलांनी तसेच महिला संघटनाच्या प्रतिनिधिनी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. आर. माने यांनी केले आहे.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर स्थानिक महिला संघटनांचे , संस्थाचे दोन प्रतिनिधी व महिलांच्या कायद्या संदर्भात कार्यरत पाच अशासकीय महिला कार्यकर्ते असे सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. ज्यांच्यात क्षमता, सचोटी आणि प्रतिष्ठा असेल आणि ज्यांना महिलांच्या समस्या सोडविण्याबाबतचे पुरेसे ज्ञान व अनुभव असेल, ज्याचे वय त्यांच्या नामनिर्देशनाच्या दिनांकास 35 वर्षापेक्षा अधिक नाही अशा व्यक्तीमधून ही नियुक्ती करण्यात येणार आहे.