Breaking News

खडसे आणि पृथ्वीराज चव्हाण, मोहन प्रकाश भेटीने राजकीय चर्चांना उधाण

मुंबई, दि. 01, फेब्रुवारी - भाजपचे नाराज नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची आज काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण व मोहन प्रकाश यांच्याशी औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. हे तिघे आज विमानातून दिल्लीला एकत्रही गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान नाराज खडसे यांनी आज केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचीही भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते.


असे असले तरी काँग्रेस प्रवेशाबाबत खडसे यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना तूर्तास पूर्णविराम दिला आहे. औरंगाबादहून दिल्लीपर्यंतच्या प्रवासात मोहन प्रकाश व पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी भेट झाली. दिल्लीत गडकरींशीही भेटलो. पण तेथे शहाद्यातील साखर कारखान्याच्या प्रकल्प उद्घाटनाचे आमंत्रण दिले असल्याचे खडसे म्हणाले.