ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीनेच केल्या निविदा प्रसिध्द; निविदा उघडताना मात्र घोटाळा झाला उघड
श्रीगोंदा पंचायत समीतीचा‘विजय’च्या साथीने पुन्हा एक नवीन‘विक्रम’
श्रीगोंदा/अमर छत्तीसे/- श्रीगोंदा तालुका ऑनलाईन निविदा कामाच्या बाबतीत आजपर्यंत कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. म्हणुनच तर श्रीगोंदा तालुक्याची स्थिती जणु आंधळ दळतय आणी कुत्र पीठ खातयं या म्हणी प्रमाणे झाल्याची म्हणने वावगे ठरणार नाही.
मागील महिन्यात तालुक्यातील एका प्रमुख गावातील निविदेत झालेला गैरव्यवहार चांगलाच गाजल्याचे चित्र तालुक्याला पाहावयास मिळाले. यामधुन तालुक्याचे प्रमुख अधिकारी सक्तीच्या रजेवर जाण्याच्या घटना सुध्दा घडल्या मात्र अद्यापही कोणतीही सुधारणा या कामाच्या बाबतीत झाल्याचे चित्र दिसत नाही. मागील पंधरा दिवसापुर्वी तालुक्यातील एका गावची निविदा नगर येथून प्रसिध्द करण्यात आली. या निविदेत मुदती अखेर तीन निविदा प्राप्त झाल्या. तरी सुध्दा या निविदा प्रसिध्द करणा-या खाजगी व्यक्तीने याच गावातील प्रतिष्टीत व्यक्तीच्या सांगण्यावरून मोठ्या आर्थीक तडजोडीतुन निविदेचा कार्यकाळ परस्पर वाढवुन दिला. वास्तविक पाहता ही गोष्ट कोणत्याच शासन नियमाला अनुसरुन नाही,परंतु अशी घटना घडली. यामध्ये अनेक तक्रारी झाल्या याची दखलखुद्द समाजकल्याण विभागाचे सभापती उमेश परहर यांनी घेतली. सर्व संबंधीत अधिका-यांची त्यांनी घेतलेल्या मीटींगमध्ये चांगलीच झोप उडवीली.
हा विषय संपतो न संपतो तोच तालुक्यातील एका प्रसिध्द गावची निविदा याच महाशयांकडुन प्रसिध्द करण्यात आली. निविदेबाबत सर्व प्रक्रिया पार पडली निविदेत सर्व निविदा भरुन झाल्या मात्र निविदा उघडते वेळी संबंधीताच्या असे लक्षात आले की, निविदा दलितवस्तीची असुन निविदेसाठी दिलेले सर्व अधिकार हे त्या गावचे ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांचेकडे आहेत. परंतु संबंधीत गावच्या त्या ग्रामसेवकाची बदली गेल्या सहा महिन्यापुर्वीच शेजारच्याच एका तालुक्याला झालेली असुन,त्या ग्रामसेवकाचा तसे पाहता काडीमात्रही शासकीय अधिकार या गावामध्ये राहिलेला नाही.तरीही त्याच्या सहीने निविदा प्रसिध्द करण्याचा घाट पंचायत समीतीतील ग्रा. पं. विभागातील अधिकारी यांच्या म्हणण्याने घालण्यात आलेला आहे. तसेच हाच प्रतिष्ठीत अधिकारी आपल्या पदाचा दबाव आणुण संबंधीत ग्रामसेवकाला धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. परंतु सदर ग्रामसेवक या विषयात आणि निविदेबाबत अद्याप ही अनभिज्ञ आहेत. कारण या प्रक्रियेत त्यांचा काडीमात्रही संबंध येत नाही.
तालुक्यात पंचायत समितीत ग्रा.पं विभागातील एका मोठ्या अधिका-याच्या अट्टाहासापायी आणि तालुक्यातील निविदा प्रक्रिया सुरळीत पार पाडाव्यात या कामासाठी मोठ्या आर्थिक तडजोडीने नगर जिल्हा परिषद येथे एस 2 इंफोटेक या कंपनीच्या प्रकल्पाकडे जिल्हा हार्डवेअर म्हणुन कार्यरत असलेल्या एका व्यक्तीची नेमणुक केली गेली. सदर व्यक्तीस मोठा आर्थीक ऐवज जमा करुन संबंधीत सर्वांचेच भागवुन स्वत:चे पोट भरवायचे असल्याने प्रत्येक कामात मोठी माया जमवण्याचा सपाटाच या व्यक्तीने सुरु केल्याचे तसेच त्याचे हप्ते शासकीय अधिकारी आणी आपल्या कंपनीपर्यंत पोहोच करण्याचे काम सदर व्यक्ती करत आहे. म्हणजेच कंपनी व्यवस्थापनाने असे हप्ते गोळा करण्याची आणि अधिकारी यांचेसोबत आपलेही पोट भरण्याची मोठी टोळीच तयार केलाचे चित्र आहे. या विषयाची पंचायत समीती वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे.
खाजगी व्यक्तीसाठी अट्टाहास का ?
दलित वस्ती सुधार योजनेच्या विविध विकास कामांच्या ऑनलाईन निविदा काढण्यासाठी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निविदा मागविल्या जातात. पण यात मध्यन्तरी मोठा गोंधळ झाला होता. म्हणून पंचायत समितीने या निविदासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता.यामध्ये एक बांधकाम विभागाचा इंजिनियर नियुक्त करण्याचे ठरले होते, पण मध्यन्तरी या विषयाला बगल देऊन ग्रामपंचायत विभागातील एका अधिकाऱ्याने आपला दाब टाकून या सर्व डिजिटल स्वाक्षऱ्या आपल्याकडे घेऊन सर्व निविदा प्रसिद्ध करण्यासाठी नगर येथील खाजगी व्यक्ती नेमला आहे. त्या व्यक्तीसाठी अनेकदा पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्याला जाब विचारला पण तो अधिकारी काही त्या खाजगी व्यक्तीला नकार देण्यास तयार होत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचे व ग्रामपंचायत विभागाचे नेमके साटेलोटे काय आहे असा सवाल उपस्थित होत आहे.