Breaking News

क्रांतीकारी शेतकरी पक्षाची झेंडा मिरवणूक


नेवासा /शहर प्रतिनिधी/- नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त रविवार, दि.४ फेब्रुवारी रोजी क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या वतीने झेंडा मिरवणूक काढण्यात आली.

या झेंडा मिरवणुकीत नेवासा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, शेतकरी नेते पी. आर. जाधव, नगरसेवक अँड.बापूसाहेब गायके, जेष्ठ विधीतज्ञ अँड.के.एच. वाखुरे,नगरसेवक संदीप बेहळे, अंबादास इरले, सतीश पिंपळे, जितेंद्र कु-हे, सचिन वडागळे,महेश मापारी,गडाख यांचे स्वीय सहायक सुनील जाधव, कैलास कुंभकर्ण, प्रकाश सोनटक्के, अँड.मयूर वाखुरे, विशाल सुरडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.