Breaking News

मजुरांच्या अज्ञानाचा लाटला फायदा,घाम अन् रक्त पिणार्या तालुका कृषी टोळीला जिल्ह्याचे अभय

नाशिक/प्रतिनिधी :- ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत मेगा पाणलोट विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करतांना जिल्हा कृषी खात्यातील भ्रष्ट प्रवृत्तींमुळे मंजूर निधीला पाय फुटले असून मंजूर योजनांवर संकल्पीत केलेला खर्च नक्की कुठे झिरपतो? कामावर असलेल्या मजुरांसह भाडे तत्वावर घेतलेल्या स्थानिक खाजगी संसाधनाची मजूरी वेळेवर आणि दिली गेली क ा? या सारखे प्रश्‍न गेल्या सात वर्षापासून अनुत्तरीत आहेत.


दरम्यान या कार्यक्रमांतर्गत शासनाचा विकासाच्या सर्वमान्य उद्दिष्टांसोबत विविध रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्या जात असून रोजगारातून उदरनिर्वाह होण्याऐवजी मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे.कृषी खात्यातील भ्रष्टाचारामुळे अडकलेली मजूरी मिळवण्यासाठी अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.सात वर्षापासून संबंधित मजूर आपल्या हक्कासाठी संघर्ष करीत असतांना जिल्हास्तरीय वरिष्ठ कृषी अधिकारी ढिम्म असल्याने गावपाड्यापासून जिल्हा कृषी क ार्यालयापर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कार्यरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

राज्यातील पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत नाबार्डकडून कर्ज उपलब्ध करून घेत राज्यातील 793 उच्च प्राथमिकता असलेल्या पाणलोटांपैकी 68 मेगा पाणलोटातील 260 क्लस्टर पाणलोट पूर्ण करण्यासाठी दि.18 जानेवारी 2011 रोजी नाबार्ड 2010 /प्र.क्र.91 /जल-7 या शासन निर्णयाने मान्यता मिळाली.

या ननिर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अतिदुर्गम मानले गेलेल्या पेठ तालुक्यातील एकदरा जामनमाळ,बेहेडमाळ,उस्तळे,हनुमंतपाडा,डोलारमाळ,उभिधोंड,देवगाव या भागात तालुका कृषी विभागामार्फत पाणलोट ,गतीमान जलयुक्त शिवार योजना राबविली गेली.सन 2011 पासून सुरू झालेली ही योजना यशस्वी करण्यासाठी योजनेच्या मुळ हेतू प्रमाणे स्थानिक पातळीवरील बेरोजगार हातांना काम मिळावे,चटणी भाकरीचा प्रश्‍न मार्गी लागावा म्हणून स्थानिक मजूरांना हे काम देण्यात आले.स्थानिक ट्रक्टर भाडे तत्वावर लावण्यात आले.स्था निक शेतकर्यांसाठी ,भुमीहीन ,शेतमजूर,महिला यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणारी ही योजना सुरूवातीच्या काळात चांगली लोकप्रिय झाली.गावपातळीवर योजना उचलून धरली.

तथापी गावपाड्यावरील अशिक्षित मजूरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पेठ तालुका कृषी खात्यातील भ्रष्टाचाराची लत लागलेल्या तत्कालीन कृषी अधिकारी क र्मचार्यांनी मजूरांच्या कष्टावर योजना पुर्ण केली.माञ कष्टाचा मोबदला देतांना फाळके मारण्याच्या नवनव्या क्लूप्त्या शोधून मजूरांचा घाम आणि रक्त पिऊन या लतखोरांनी आपली भ्रष्टाराची तहान भागवली.अशा अनेक तक्रारी लोकमंथनकडे लेखी स्वरूपात या मजुरांनी केल्या आहेत.
पेठ तालुका कृषी खात्यातील हे भ्रष्ट अधिकारी कर्मचारी निर्ढावलेले असून पैसे मागण्यासाठी येणार्या मजुरांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे.सात वर्ष या भ्रष्ट मंडळींनी हे प्रकरण कुठेही वाच्यता होऊ नये वेगवेगळ्या मार्गाने थोपवण्याचा प्रयत्न केला.कधी पेठ तालुक्यातील राजकारणात बाहुबली म्हणून मान्यता असलेल्या पुढार्यांचा दबाव तर कधी दोन पाच लाख रूपयांचे अमिष दाखवून शांत राहण्याची तंबी .तरीही ऐकले नाही तर जीव गमावून बसाल असा निर्वाणीचा इशारा.

मजूरांची मजूरी खाण्याचे पाप करणारे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी आणि त्यांचे दोन तीन सहकारी कार्यभाग उरकून अन्य ठिकाणी नवे सावज शोधत आहेत तर या कर्मक ांडातील अन्य काही सहकारी पेठ तालुका कृषी खात्यातच जुन्या पापाने डोके काढू नये म्हणून तजवीज करण्यात व्यस्त आहेत.विशेष म्हणजे हे सारे प्रकरण जिल्हा कृषी खात्याला सुपरिचीत असूनही वरिष्ठ कृषी अधिकार्यांचे जाणीवपुर्वक होत असलेले दुर्लक्ष भ्रष्टाचारात लुप्त असलेल्या तालुका पथकाला प्रोत्साहनकारक ठरू लागले आहे.जिल्हा कृषी विभागाची ही अनभिज्ञता पेठ ते नाशिक दरम्यानच्या भ्रष्टाचाराच्या साखळीला दुजोरा देत आहे.(क्रमशः)