Breaking News

इंधन दरवाढीच्या विरोधात तहसिलवर धडकला कॉगे्रसचा बैलगाडी मोर्चा

चिखली,(प्रतिनिधी): सर्व सामान्य जनतेला चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखवित विद्यमान भाजपा सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव वाढविण्याचे काम गेली वर्षभर सुरू ठेवले आहे. आज मागिल सहा महिन्यातील सर्वोच्च भाव पातळीवर पेट्रोल, डिझेलचे भाव पोहचले आहे. तर घरगुती गॅस सिलेंडर आजच्या सार्वाधिक किमतीवर पोहचल्याने सर्व सामान्यांचे जिवन जगने अवघड होवून त्यांचे घरगुती बजेट कोलमडून गेले आहे. हा आर्थीक फटका बसणा-या सर्व सामान्य नागरीकांचा आक्रोश सरकारचे कानावर पोहचविण्यासाठी जिल्हा कॉगे्रस कमिटीने तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्याचे दिलेल्या निदेर्शावरून चिखली तालुका व शहर कॉगे्रस कमिटीच्या वतीने चिखीतील क्रीडा संकुलापासून तहसिल क ार्यालयावर प्रचंड मोठा बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून, पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करतांना इतरही जिवनाश्यक वस्तुच्या होणा-या भाववाढीकडे बॅनरचे माध्यमातून लक्ष वेधण्यात आले होते. अशा या बैलगाडी मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांकडून होणारी नारेबाजी व सरकारच्या निषेधार्थ दिल्या जाणा-या घोषणा यामुळे मार्चा मार्गावरील परीसर दणाणुन गेला होता. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केले. 

दिवसेदिवस नियमीतपणे दरवाढ केल्यासारखी पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दरात केली जाणारी वाढ, या विरोधात यापूर्वीही कॉगे्रसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. परंतु दरवाढ कमी होण्याऐवजी वाढतच गेली आहे. त्यामुळे जनसामान्यात प्रचंड असंतोष असून हा असंतोष सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी कॉग्रेसच्या वतीने आज चिखलीत तालुका क्रीडा संकुल ते बस स्टॅन्ड, शिवाजी महाराज पुतळा, जयस्तंभ चोैक, स्वास्तीक चौक, सिमेंट रोड, बैलजोडी मार्गे तहसिल कार्यालय असा बैलगाडी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. जवळपास 50 बैलगाडयांचा सहभाग त्या मागोमाग शेकडो कार्यकर्ते घोषणा देत मोर्चात सहभागी झाले होते. सर्व मार्ग दणाणून सोडत व प्रचंड घोषण बाजी करीत मोर्चा तहसिल कार्यालयावर पोहचला असता, कॉगे्रसच्या वतीने आमदार राहुलभाउ बोंद्रे, चिखली तालुका कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, युवक कॉगे्रसचे विधानसभा अध्यक्ष रमेश सुरडकर, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, पंचायत समिती सभापती सौ. संगिताताई पांढरे यांचे नेतृत्वात तहसिलदार यांचेकडे निवेदन देण्यात येवून जाचक भाववाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अन्यथा या पेक्षाही तिव्र आंदोलन उभारल्या जाईल असा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला. 
या मोर्चात बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, जि.प.सदस्य अशोकराव पडघान, संजय पांढरे, सुधाकर धमक, दिपक देशमाने, सरपंच रिजवान सौदागर, महेंद्र बोर्डे, नंदु शिंदे, डॉ. इसरार, नगरसेवक रफिकसेठ,आसिफ भाई, दिपक खरात, गोकुळ शिंगणे, रउफभाई, किशोर कदम, कैलास खराडे, शिवनारायण म्हस्के, विजय शेजोळ, रूपराव पाटील, प्रशांत देशमुख, तुषार बोंद्रे, विलास चव्हाण, तुषार भावसार, भारत म्हस्के, रामधन मोरे, विजय पाटील, प्रमोद पाटील, जिवन देशमुख, शेषराव पाटील, प्रकाश करवंदे, सुभाष तायडे, संजय गिरी, पिंटू गायकवाड, संजय सोळंकी, गयाज बागवान, अब्रार बागवान, शेख इम्राण, पवन रेठे, विजय जागृत, बाळु साळोख, राजु सावंत, लिबांजी सवडे, सुभाष सोनाळकर, विलास कंटूले, अविनाश महाजन, डिगांबर देशमाने, बंडु खरात, बिदुसिंग इंगळे, राम सुरडकर, दिलीप चवरे, प्रकाश सपकाळ, अभय तायडे, समाधान गिते, शिवा म्हस्के, शुभम पडघान, अमोल सुरडकर, मकरंद भटकर, शेख अमिन, अनिल राठोड, मुकूंद पैठणे, पुरूषोत्तम हाडे, सुभाष गायकवाड, भानदास थुटे, सिध्देश्‍वर परीहार, गणेश ठेंग, सुनिल पवार, कृष्णा चौथे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 
या मोर्चात महागाईचा निषेध दर्शविण्यासाठी बैलगाडीवर मोटार सायकल ठेवून त्यावर बाजार समितीचे माजी सभापती संजय पांढरे स्वार होवून बसलेले होते. तर एका बेैलगाडीवर बंद पडलेले पेट्रापंचाचे मशिन ठेवून त्यावर निषेधाचे नारे लिहण्यात आले होते. याशिवाय या बैलगाडी मोर्चात सहभागी विविध बैेलगाडयावर कॉगे्रसचे पदाधिकारी बैलगाडी हाकत असल्याने रस्त्यावर एक वेगळेच चित्र निर्माण झाले होते. कॉगे्रसचे झेंडे लावलेल्या निषेधाचे घोषणा असलेले फलक लावलेल्या कॉगे्रसचे काळातील दर व आताच्या भाजपा सरक ारच्या काळातील दर यातुुन माहागाईचे वाढ दर्शविणारे तक्ते बेैलगाडयांवर लावलेले दिसून येत होते. त्या शिवाय कधी नव्हे ते एकाच वेळी बैलगाडीची मोठी संख्या या रस्त्यावर पाहायला मिळाल्यानेही जनतेत उत्सुक्ता दिसून येत होती.