Breaking News

सरकारी वकील उज्वला मोहोळकर यांचा सत्कार

पालघर, दि. 21, फेब्रुवारी - वसईत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणार्‍या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळविण्यात महत्वाची कामगिरी बजावणार्‍या सरकारी वकील उज्वला मोहोळकर यांचा नुकताच पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


2014 रोजी एक वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेतून घरी परतत असताना आरोपी राहुल गजानन तुंबडा याने तिला मोटारसायकलवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून जंगलात नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचे तोंड दाबून तिची हत्या केली. याप्रकरणी वसई तालुक्यातील वालीव पोलिस स्टेशनमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. या गुन्हाच तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक राणी पुरी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी या गुन्हाच सखोल तपास करत आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करून वसई सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्हात सरकारी वकील म्हणून उज्वला मोहोळकर यांनी विशेष रू पाने काम पहिले. आरोपी राहुल तुंबडा याच्या विरोधात गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने त्याला वसई सत्र न्यायालयाने हत्येच्या गुन्ह्यात सश्रम जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या गुन्ह्याच्या सर्व न्यायालयीन प्रकरणात आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देण्यात सरकारी वकील उज्वला मोहोळकर यांनी विशेष महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्यामुळे त्याचा पोलिस अधीक्षक सिंगे यांच्या मार्फत सत्कार करण्यात आला.