Breaking News

चव्हाण प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीत बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन

रत्नागिरी, दि. 21, फेब्रुवारी - जागतिक महिला दिनानिमित्त बचतगटांनी तयार केलेल्या मालाची विकी व प्रदर्शन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागीय केंद्रातर्फे रत्ना गिरीत आयोजित करण्यात आले आहे.

गोळप येथील फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 9 मार्च ते 12 मार्च या कालावधीत बचतगट व इतर उद्योगिनी महिलांनी बनविलेल्या मालाचे विकी व भव्य प्रदर्शन साई मंगल कार्यालय (जे. के. फाइल्स़, रत्नागिरी) येथे होणार आहे.


या कालावधीत महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यामध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शन, प्रशिक्षण, विविध स्पर्धा़, फनी गेम्स व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. तसेच बनविलेल्या मालाच्या विक्रीचा स्टॉलही लावावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे क रण्यात आले आहे. स्टॉलच्या नोंदणीसाठी (02352) 221701 किंवा 9422376224 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.