Breaking News

कुर्डुवाडीत बारदाना दुकान जळून खाक ; 50 हजारांचे नुकसान

सोलापूर, दि. 21, फेब्रुवारी - टेेंभुर्णी रोडवरील श्रीराम बारदाना दुकानाला आग लागल्याने अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. आगीचे कारण समजू शकले नाही. परिसरातील तरुणांच्या सर्तकतेमुळे शेजारच्या दुकानाचे नुकसान टळले. टेंभुर्णी रोडवरील जिल्हा परिषद कार्यालयाजवळ टपर्‍या, दुकाने असून, यामध्ये रणजित पाटील यांचे बारदाना दुकान बंद होते. अचानक धूर निघू लागल्याने त्याचे रूपांतर आगीत झाले. यामुळे शेजारील घड्याळाचे व मोबाईल दुकान त्वरित रिकामे करण्यात आले. आग वाढत चालली असताना नगसेवक अरुण काकडे यांनी नगरपरिषदेच्या नळाला पाणी सोडण्यास सांगितले. पाण्याच्या मदतीने उपस्थित तरुणांनी आग आटोक्यात आणली. यानंतर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबाने पूर्ण आग विझवली. यामध्ये कोणतही जीवितहानी झाली नाही. आगीमध्ये कांदा, साखर, गहू, लिंबू, बोर असे आदींचा बारदान होता. तो जळाल्याने 50 ते 55 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकान मालक रणजित सुधीर पाटील यांनी सां गितले.