पारनेर बाजार समितीत कांद्याचे भाव वधारले!
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी गाड्यांची आवक झाली होती. आवक मागील आठवड्याच्या तुलनेत खूप कमी झाली. निर्यात मूल्य केंद्र शासनाने घटल्याने कांदा निर्यात करणे सोपे झाल्यामुळे तसेच इतर देशांमध्ये कांद्याला मागणी चांगली असल्याने भावात वाढ झाली. चांगल्या प्रतीच्या कांद्याला २०००/- ते २५००/- रूपये दुय्यम प्रतीच्या कांद्याला १७००/- ते २०००/- गोटीला १२००/- ते १५००/- असे दर राहिले. मागील लिलावाच्या तुलनेत पाच ते सात रुपये दर वाढल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत होते. तसेच मागील लिलावात भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा सुकुन देऊन परिपक्व कांदा बाजारात आणला. तसेच निर्यात मूल्य शून्य झाल्याने भावात वाढ झाल्याचे प्रभारी सचिव शिवाजी पानसरे यांनी सांगितले.