महाराष्ट्र साहित्य संघातर्फे राहुरीत राज्यस्तरिय शिवकाव्य संमेलन कोण होणार राहुरीचा शिवकाव्य सम्राट ?
या शिवकाव्य संमेलनासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी ठेवण्यात आली आहे. संमेेलनात 60 कवींचा सहभाग असणार आहे. मुंबई, जालना, धुळे, पुणे, नाशिक या भागातून अनेक कवींनी आपला सहभाग नोंदविला आहे.
या काव्य संमेलनात स्वरचित, अप्रकाशित कविता सादर करण्याची अट असून, नोंदणी फी रु. 200/-असून कवींनी लवकरात लवकर करण्यासाठी कार्याध्यक्ष अनुसंगम शिंदे(8999128245),राहुरी, सचिव सुरेश पाटील यांच्याशी संपर्क करावा. तसेच लवकरात लवकर कवींनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रायोजक प्रमोद वसंतराव शिंदे यांनी केले आहे.
