राज्यात जंत नाशक दिन साजरा करत असतानाच जामखेड तालुक्यातील विविध शाळा व अंगणवाडयांमध्ये जंत नाशक दिन साजरा करून 1 ते 19 वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना जंत प्रतिबंधक गोळ्या वाटण्यात आल्या. जागतिक जंत दिन 10 फेब्रुवारीनिमित्त असाच उपक्रम जामखेड येथील सदाफुले वस्ती वरील अंगणवाडीत राबविण्यात आला. 10 फेब्रुवारी हा जागतिक जंत दिन म्हणून जंत प्रतिबंधक उपाय अथवा औषध देऊन राज्य सरकारच्या वतीने सर्वत्र शाळा, अंगणवाडया, जिल्हा परिषद शाळा यांच्या माध्यमातून साजरा केला जातो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शालेय विद्यार्थ्यांचा जंतांपासून बचाव व्हावा म्हणून शासनाच्या वतीने त्यासाठी तयार करण्यात आलेल्या औषधी मुलांना दिल्या जातात, तसेच जंत हा पोटातील विकार किटाणू पासून होत असल्याने मुलांनी धूळ अथवा चिखल मातीत खेळू नये अशा संदर्भातील प्रबोधन करून शालेच्या वतीने मार्गदर्शन ही केले जाते.अंगणवाडीत विदयार्थ्यांना जंत प्रतिबंधक गोळ्या आशा गट प्रवतक सुवर्णा हजारे, आशा सेविका रेखा अवसरे, रेहना शेख, अंगणवाडी सेविका हिराबाई हजारे, सुरेखा शिंदे, यास्मीन खान यांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.
जागतिक जंत नाशक दिनानिमित्त प्रतिबंधक उपाय
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:30
Rating: 5