Breaking News

विक्रांत सावंत यांच्या पत्नीचे प्रसूतीदरम्यान निधन

सिंधुदुर्गनगरी, दि. 11, फेब्रुवारी - शिवसेनेचे सावंतवाडीचे विधानसभा मतदारसंघप्रमुख विक्रांत सावंत यांच्या पत्नी सोनल यांचे वाशी येथील एमजीएम रुग्णालयात प्रसूतीदरम्यान निधन झाले आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली. वाशी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विक्रांत यांच्याशी विवाह झाल्यावर सोनल सावंतवाडीत आल्या. सावंतवाडीला त्यांनी आपल्या लाघवी स्वभावाने लळा लावला. विक्रांत यांनी जशी माणस जोडली होती तशीच माणस सोनल यांनी देखील जोडली. सोनल या मुळच्या जुन्नरच्या. त्यांचे वडील रामदास नीळख हे नवी मुंबईचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक. चार वर्षांपूर्वी सोनाल यांचा विवाह विक्रांत यांच्याशी झाला. त्यांना नाव्या हि तीन वर्षांची मुलगी आहे. ज्या घराण्याला माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या सारख्याचा समाजसेवेचा वारसा आहे त्याला साजेसच सोनल याचं व्यक्तिमत्व होत.
सोनल प्रसूतीसाठी मुंबईत होत्या. दोन दिवसांपूर्वीच त्यांना वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरनी सीझर करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया झाली त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. पण हा आनंद क्षणिकच होता. कारण अति रक्तस्त्रावान सोनल यांची प्रकृती चिंताजनक बनली. त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना आठहून अधिक बाटल्या रक्त चढवण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती ढासळत गेली. प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना व्हेटीलेटरवर ठेवण्यात आले. त्यांना शुद्ध आली नव्हती. त्यातच विक्रांत यांच्या पदरात दोन मुलांना ठेवून सोनलनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली. शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, काँग्रेसचे बाळा गावडे, रवींद्र म्हापसेकर, के.टी.परब, सी.एल.नाईक, सोनू सावंत, सतीश बागवे, संदीप सुकी आणि विक्रांत सावंत यांचे सहकारी दिनेश नागवेकर, बाळासाहेब माने, बाळासाहेब नंदिहळ्ळी हि मित्रमंडळी लगेचच मुंबईला रवाना झाली.
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जि.प.अध्यक्षा रेश्मा सावंत, महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजु परब, उद्योजक पुष्कराज कोले, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राजू नाईक, राजू मसुरकर यांनी सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले. सोनल यांच्यावर वाशी-नवी मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनल यांच्या पश्‍चात तीन वर्षांची मुलगी नाव्या, पती विक्रांत, सासरे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, चुलत सासरे अण्णा सावंत, चुलत सासू, दीर असा परिवार आहे.