Breaking News

कल्पक तरूणांसाठी सांगली फर्स्ट हे प्रदर्शन सुवर्णसंधी - सुभाष देशमुख


मुंबई / सांगली, - सांगली फर्स्ट हे प्रदर्शन कल्पकता असणार्‍यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण हीच मंडळी सांगलीचे भविष्य घडवणार आहेत. मेक इन इं डिया, मेक इन महाराष्ट्र प्रमाणेच मेक इन सांगली हे उद्दिष्ट या प्रदर्शनातून सफल होईल, असा विश्‍वास पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केला. 
प्रस्तावित ड्राय पोर्टमुळे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, कारखानदार यांना लाभ होणार आहे, असे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सांगलीची भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे. मात्र, येथे शेतीची बाजारपेठ चांगली आहे. येथील मिरची, गूळ, हळद आणि बेदाणे ही कृषि उत्पादने जगविख्यात आहेत. त्यामुळे जगभरातील व्यापारी सांगलीकडे वळवा. सांगलीचा क्रमांक प्रथम असेल, यासाठी प्रयत्न करा. या प्रदर्शनात मिळालेल्या नवनव्या संकल्पनांतून तरूण, युवा उद्योजक नवनवी उत्पादने तयार करतील. सांगलीचे नाव वैभवशाली करतील. शासनाचे सहकार्य आपणास आहे, असे ते म्हणाले.