Breaking News

साकीनाकामध्ये चिमुकलीचे अपहरण ; 6 तासांत सुटका ; आरोपीला अटक


मुंबर्ई - एका चिमुकलीचे दुकानाबाहेरुन अपहरण केल्याची खळबळजनक घटना साकीनाका परिसरात घडली आहे. चिमुकली अचानक गायब झाल्याने तिच्या आई-वडिलांनी शोधाशोध सुरु करण्यास सुरुवात केली. मात्र, मुलगी कुठेच दिसत नव्हती. मुलीचा शोध घेतल्यानंतरही ती कुठेच भेटली नाही. अखेर चिमुकलीच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन शोध सुरु केला. दुकानाबाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी 6 तासांच्या आत चिमुकलीची सुखरुप सुटका केली आणि आरोपीला अटक केली.