Breaking News

देवरूखच्या महिला बचत गट कबड्डी स्पर्धेत खेडचा संघ विजेता

रत्नागिरी, दि. 20, फेब्रुवारी - संगमेश्‍वर तालुक्यातील देवरूखच्या कांगणेवाडी येथील सखी महिला बचत गटाने जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धेत भरणे (खेड) येथील अनिकेत संघाने खेर्डी (चिपळूण) येथील जिजाऊ संघावर विजय मिळवला. देवेंद्र पेंढारी व राजू रेवणे पुरस्कृत रोख 15 व 10 हजार रुपये आणि चषक देऊन दोन्ही संघांना गौरवण्यात आले. यावेळी चिपळूण पंचायत समितीच्या सभापती सौ.पूजा निकम उपस्थित होत्या.

साखळी स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. राष्ट्रीय खेळाडू श्रद्धा पवार, समरीन बुरोंडकर, ललिता घरट यांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट पकडीसाठी रोहिणी बैकर (अ निकेत खेड), चढाईसाठी नाजिया मणियार (जिजाऊ खेर्डी), अष्टपैलू सिद्धी चाळके (अनिकेत भरणे), मानकरी म्हणून मानसी शिगवण (गजानन संघर्ष केळशी), दिव्या सक पाळ (चिपळूण स्पोर्ट्स) यांना गौरवण्यात आले.
महिला बचत गटाने कबड्डी स्पर्धा घेण्याचा आगळा वेगळा उपक्रम सार्योनांचे भावला. त्याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, चिपळूणच्या सभापती पूजा निकम यांनी मंडळाच्या अध्यक्षा प्रभावती पेंढारी यांचे विशेष कौतुक केले.