Breaking News

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार मधुकर नेराळे यांना प्रदान


ज्येष्ठ तमाशा कलावंत तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत मधुकर नेराळे यांना मागील वर्षीच्या पुरस्कारप्राप्त तमाशा कलावंत राधाबाई खोडे-नाशिककर यांच्या हस्ते वाशी येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती होती. सिडको प्रदर्शन केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. रु. ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर तमाशा ढोलकी फड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.तमाशा रसिकांनी याचा आनंद घेतला.