सागरी महामार्गाचा वाहतूक सर्वे सुरु
सिंधुदुर्ग, - मुंबई-गोवा महामार्गानंतर सागरी महामार्ग रुंदीकरणाच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. विजयदुर्ग ते वेंगुर्ले या सागरी महामार्गावर पाच ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा बसून वाहतूक सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. यात सलग सात दिवस महामार्गावरून जाणा-या वाहनांची क्षमता, वेग, संख्या याची माहिती संकलित केली जात आहे. पाचही ठिकाणी खास तंबू उभारून खासगी एजन्सीकडून सर्व्हे करण्यात येत आहे. दर तीन महिन्यांनी हा सर्व्हे करण्यात येणार आहे. याचा अहवाल थेट केंद्रीय मंत्रालयात सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांतच सागरी महामार्गाच्याही रुंदीकरणाची कार्यवाही सुरू होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरात मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाची कार्यवाही सुरू करण्यात येत होती. आता प्रत्यक्षात भूमिपूजनानंतर रुंदीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हजारो झाडे, शेकडो दुकाने हटविण्यात आली आहेत. काही ठिकाणी विरोधही झाला होता. तरीही प्रशासनाने आपली कार्यवाही सुरूच ठेवली होती. त्यामुळे आता कुठे प्रत्यक्षात रुंदीकरणाचे काम हाती घेतले गेले आहे. याच धर्तीवर आता सागरी महामार्गाच्या रुंदीकरणाचा आराखडा बनविण्यासाठी वाहतूक सर्व्हे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शासनाकडून पाचपट मोबदला मिळत असल्याने सागरी महामार्गाच्या रुंदीकरणासही अनेक ठिकाणी पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.