Breaking News

शिक्षणात धार्मितकेची जोड असल्यास विद्यार्थी कणखर बनतो - मा. खा. तुकाराम गडाख

शिक्षणाला धार्मिकतेची जोड नसल्यामुळे आज विद्यार्थ्यांच्या जिवनात नैराश्य निर्माण होतांना दिसते. परिणामी शेतकरी वर्गासारखा सुशिक्षित वर्ग ही, आत्महत्येकडे वळताना दिसतो. धर्म माणसाला सुसंस्कृत व बलवान बनवतो, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, हे उपक्रम सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्यासाठी उपयुक्त ठरतात, यासाठी शिक्षक नेहमीच धडपड करत असतात. नुकत्याच पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये या विद्यालयाचा कार्तिक घोरपडे, याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये निवड झाली, ही खूप मोठी अभिनंदनाची गोष्ट आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिक्षक नेहमीच पुढाकार घेत असतात. आजच्या समाजाला सुसंस्कृत समाजाची गरज आहे, आजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना पुरेसा वेळ मुलांकडे पाहावयास मिळत नसल्यामुळे आजची शिक्षकाची भूमिका ही पालक व गुरूंची आहे. हे काम केवळ शिक्षकच करू शकतात. पालक वर्ग सुशिक्षित असल्यामुळे शिक्षकांनी गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत माजी खा. तुकाराम पाटील गडाख यांनी व्यक्त केले.


शेवगाव येथील आदर्श कन्या विद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत बोलत होते. यावेळी पारितोषिक प्राप्त विद्यार्थी राज्यस्तरीय स्काऊट गाईड पुरस्कार पानसरे वेदांत, कौतुक अंचवले, विज्ञान प्रदर्शनात राज्य स्तरासाठी कार्तीक घोरपडे, वर्क्तृत्व स्पर्धा आकाश कंदील, मेहंदी, चित्रकला, रांगोळी, अपूर्व विज्ञान मेळावा, मतदार जनजागृती अभियान, निबंध स्पर्धा मध्ये तनुजा लोणारी, श्रुती घाडगे, श्रुती मुळे, प्रणिती वेताळ, मुस्कान शेख, गायत्री पवार, वैष्णवी केळकर, अक्षदा सुरोसे, अंकिता मोटकर, श्रुती पानसरे, उत्कर्ष सकट, ज्ञानेश्‍वर दरंदले, ओम गायकवाड, महेश जाधव तसेच यावेळी मैदानी स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला, याप्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, ज्येष्ठ पत्रकार उमेश घेवरीकर यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाला शेवगांवचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे, मेघा कांबळे, मा. नवनाथ भापकर, केंद्रप्रमुख अशोक घुमरे, कॉम्रेड संजय नांगरे, याकूब पठाण, मनिष बाहेती आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब खेसमाळकर, तर सूत्रसंचालन मुकुंद अंचवले यांनी तर आभार श्रीमती सविता म्हस्के यांनी मानले.