Breaking News

घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा डाव सोनिया गांधी यांची टीका


नवी दिल्ली : सरकार सत्तेत येऊन चार वर्ष झाली, मात्र सरकारकडून घटनात्मक संस्थाच कमकुवत करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. संसद, न्यायालय, प्रसारमाध्यम, इतकेच नाही तर नागरी समाजाला सरकारने सोडलेले नाही, तर सुरक्षा यंत्रणांना फक्त विरोधकांना हैराण करण्यासाठीच ठेवले असल्याची टीका काँगे्रसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गुरूवारी केली. त्या काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठकीत बोलत होत्या. गुजरात आणि राजस्थानमध्ये कठीण परिस्थितीमध्ये आपण चांगले यश संपादन केले असून, कर्नाटकातही काँग्रेसला यश मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या वर्षा अखेरपर्यंत कर्नाटकात निवडणुका आहेत, सध्या इथे काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे येथील सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान आता राहुल गांधींसमोर असणार आहे. दरम्यान, या बैठकीत बोलताना सोनिया गांधींनी मोदी सरकारवरही निशाणा साधला. असेही सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. गुजरात निवडणुकीच्या आधी काँग्रेसने राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्यात आले. काँग्रेसची ही चाल काही प्रमाणात यशस्वी देखील झाली. यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारत भाजपला जोरदार टक्कर दिली. त्यामुळे एक नेतृत्व म्हणून काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहू लागले. राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे आणि आता ते माझेही बॉस आहेत, असे उद्गार काँग्रेसच्या संसदीय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काढले.