Breaking News

मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन गुरूवारी हर्षल सुरेश रावते या 45 वर्षीय व्यक्तीने उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न केलेले रावते, गंभीररित्या जखमी झाले असून, पोलिसांनी त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हर्षल रावते हे पैठणचा रहिवासी आहे. रावते यांच्यावर सेन्ट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. सोबत जयंत पाटीलही आहेत. काही दिवसांपूर्वी धुळ्याच्या धर्मा पाटील या शेतकर्‍यांनं मंत्रालयातच विष घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घटना घडली होती. त्यानंतर मंत्रालयात दाद मागण्यासाठी आलेल्या आणखी एका शेतकर्‍याजवळ पोलिसांना विषाची बाटली आढळली होती. शिवाय, कालच एका उच्च शिक्षित तरुणानं मंत्रालयासमोर पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे हा प्रसंग टळला होता. अहमदनगर येथील अविनाश शेटे या 25 वर्षीय तरुणाने मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र सरकारने निर्णय न दिल्याने वारंवार मंत्रालयात येत होता. न्याय न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलले.