Breaking News

भारतीय वायुदलाच्या जमीन हस्तांतरणामुळे मिहान प्रकल्पाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण


महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व भारतीय वायुदलाच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण झाला असून वायुदलाची जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामातील मोठा अडथळा दूर झाला आहे. भारतीय वायुदलाकडे असलेली 219.58 हेक्टर जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या ताब्यात देण्यात आली असून त्याऐवजी भारतीय वायुदलाला सलग377.59 हेक्टर जमीन मिहानतर्फे देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व भारतीय वायुदलाचे स्टेशन कमॉडंट व ग्रुप कॅप्टन ए.के. चौरसिया यांनी जमीन हस्तांतरणाच्या महत्त्वपूर्ण दस्तऐवजावर सह्या करुन जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया आज पूर्ण केली. तसेच भारतीय वायुदलाच्या जमिनीचे संपूर्ण दस्ताऐवज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांना सोपविण्यात आले.