Breaking News

आंगणेवाडी येथे स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्गनगरी, दि. 03, फेब्रुवारी - लाखो भाविकांच्या उपस्थितीत आंगणेवाडीच्या भराडी मातेची यात्रा संपन्न झाली. यात्रेदरम्यान गोळा झालेला कचरा आंगणेवाडी ग्रामस्थ, आंगणे कुटुंबीय, सेवाभावी संस्था तसच शाळकरी विद्यार्थ्यांनी गोळा करत त्याची विल्हेवाट लावली.

मसुरे आंगणेवाडीचा श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव नुकताच संपन्न झाला. यावेळी लाखो भाविकांनी यात्रोत्सवास येऊन आई देवी भराडी मातेचे दर्शन घेतले. या जत्रोत्सवात अनेक हॉटेल्स, खेळणी दुकाने आणि वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आली होती. सदर दुकानदारांना जी जागा दिली जाते त्या जागेची साफसफाई न करताच हे दुकानदार दुसर्‍या दिवशी यात्रा संपली की कचरा तेथेच टाकून निघून जातात. ही साफसफाई आंगणेवाडी कुटुंबीय आणि ग्रामस्थ, पंचक्रोशीतील हायस्कूल मधील मुले करतात. यात्रा संपल्यानंतर आंगणेवाडीतील ग्रामस्थ, पोईप हायस्कूल बिळवस हायस्कूल, पणदूर हायस्कूल, त्र्यंबक हायस्कूल, मसुरे हायस्कूलचे विद्यार्थी, कॉलेज कट्टा, सिंधुदुग फोटो असो सिएशन मालवण, सनातन प्रभात, गाडगे महाराज संस्था आणि इतर संस्था यांनी या मोहिमेत सहभागी होऊन दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांनी टाकलेला कचरा जमा करून तो एका खड्यात टाकून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.