आश्वी : प्रतिनिधी :- ‘मेक इन’ महाराष्ट्रामधून रोजगाराची उपलब्धता करु, असे म्हणाणा-या भाजप सरकारने या राज्यातील युवकांचीही फसवणूक केली, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. चिंचपूर येथे सुमारे १ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास डॉ. विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलासराव तांबे, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी निघुते, पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे, भगवानराव ईलग, प्रवरा बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, अशोकराव म्हसे, मकरंद गुणे, मच्छिंद्र पावडे, दिपाली डेंगळे, गिताराम तांबे, सिताराम थेटे, गजाबा तांबे, सरपंच सिंधुताई तांबे, चेअरमन गणपतराव तांबे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, गटविकास अधिकारी एस. जी. शिंदे, उपअभियंता आर. एन तांबे, तालुका कृषि आधिकारी के. ए नवले आदी उपस्थित होते.
चिंचपूर येथे विविध विकासकामांचे उदघाटन उत्साहात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:29
Rating: 5