राहाता तालुक्यातील रुई येथील ग्रामपंचायतीची निवडणूक सरपंच व सदस्यांसाठी दि. २७ फेब्रुवारी रोजी होत आहे. या निवडणुकीत ३ हजार ४९३ मतदार मतदान करणार आहेत. जनतेतून सरपंचपदाची निवडणूक होत आहे. यासाठी ६ जण नशीब आजमावत आहेत. रुई पंचक्रोशीत ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. जनसेवा ग्रामविकास मंडळाने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंचपदासाठी संदीप बाबासाहेब वाबळे यांना उभे केले आहे. तर जनविकास परिवर्तन आघाडीने अभय विजय वाबळे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीविषयी तालुक्यात मोठी उत्कंठा आहे.