Breaking News

अग्रलेख - राजस्थानात वसुंधरा हटाव!

राजस्थानमधील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधातील भाजप कार्यकर्त्यांची नाराजी वाढत चालली आहे. राजस्थानमधील जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप अपयशी ठरला. मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे व त्यांचा मुलगा दुष्यंतकुमार यांच्याच मतदारसंघात कमळ कोमेजलं. काँग्रेसनं या मतदारसंघात विजय मिळविला. गेल्या दोन वर्षांत झालेल्या निवडणुकीत सातत्यानं भाजपला अपयशामागून अपयश वाटयाला येत आहे. भाजप इतर ठिकाणी काँगे्रसमुक्त भारत करायला निघालं असताना दुसरीकडं राजस्थानमध्ये मात्र पंजाची पकड मजबूत चालली होती. ललितकुमार मोदी व दुष्यंतकुमार यांच्यातील व्यावसायिक भागीदारी, ललितकुमार यांच्या पत्नीला राजस्थान सरकारनं दिलेलं लाभाचं पद, वसुंधराराजे यांच्या क्रिकेट सामन्यांवर झालेला लाखो रुपयांचा खर्च आदी बाबी पाहता त्या सुरुवातीपासून वादग्रस्त ठरत चालल्या होत्या. त्यातही काँगे्रसनं अशोक गेहलोत यांच्याऐवजी सचिन पायलट या युवकाकडं नेतृत्त्व सोपविलं. काँगे्रसमधील गटबाजी संपून एकीकडं तिथं एकीचं वातावरण तयार होत असताना भाजपत मात्र बेकीचं वातावरण तयार व्हायला लागलं आहे. अजमेरसह लोकसभेच्या दोन पोटनिवडणुकांत तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसनं बाजी मारल्यानं भाजपतील गटबाजी चांगलीच उफाळून आली आहे. त्यातच या वर्षात राजस्थान विधानसभेच्या निवडणुका असल्यानं भाजपपुढं पेच निर्माण झाला आहे. कोटा जिल्ह्याचे इतर मागासवर्गीय विभागाचे प्रमुख अशोक चौधरी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहून मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना हटवण्याची मागणी केली आहे. वसुंधरा राजे यांच्या कार्यशैलीवर राज्यातील जनता खूश नाही, असं त्यांन आपल्या पत्रात म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्षाचे प्रेस प्रमुख अशोक परनामी यांनाही पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष धुमसतो आहे, मी राजस्थान भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं माझ्या पत्रात मांडलं आहे, असं नमूद करून त्यांनी पत्रात म्हटलं आहे, की या पत्रातील प्रत्येक शब्द पक्ष कार्यकर्त्यांची हतबलता व्यक्त करतो आहे. पत्र लिहिण्यामागचं कारण त्यांना विचारलं असता ते म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर मला वाईट वाटलं. त्यामुळं असं पत्र लिहिण्यास मला नाईलाज झाला. राजस्थानमधील तीन जागांवर भाजपला अपयश आल्यानंतर म्हणजे एक फेबु्रवारीनंतर हे पत्र लिहिण्यात आलं होतं.’’ राज्यातील जनता वसुंधरा राजेंच्या कार्यपद्धतीवर खूश नाहीत. त्यांच्या काम करण्याच्या या शैलीमुळं कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास ढासळत आहे. त्याचा पक्ष संघटनेला फटका बसत आहे, असं म्हणत वसुंधरा राजे पक्षाला अशा मार्गावर नेत आहेत, जिथं पक्षाचा पराभव निश्‍चित आहे, असा ावाही त्यांनी केला. आगामी निवडणुकांपूर्वी पक्षात चैतन्य आणायचं असेल, तर राज्याच्या नेतृत्वात बदल करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. एकंर राजस्थान भाजपमध्ये सुरू झालेल्या संघर्षाचा पक्षाला निश्‍चितच फटका बसण्याची शक्यता आहे. कारण ज्या तीन जागांवर भाजपचा पराभव झाला, त्या तीनही जागा काँगˆेसकडून भाजपनं खेचून आणल्या होत्या. गुजरात विधानसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर राजस्थानमध्ये मिळालेल्या यशामुळं काँगे्रसमध्ये चैतन्य पसरलं आहे, तर दुसरीकडं मात्र भाजपनं आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे