Breaking News

मानसिक व शाररीक आरोग्य उत्तम महत्वाचे : शर्मा


अहमदनगर : खेळाने तणाव दूर होऊन शाररीक आरोग्य सदृढ राहते. पत्रकार व पोलिसांचे काम नेहमीच तणावपूर्ण असते. मानसिक व शाररीक आरोग्य उत्तम राहिल्यास नेहमीचे काम अधिक प्रभावी बनते. या दृष्टीकोनातून या खेळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले. प्रेस क्लब व जिल्हा पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ महोत्सवा’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे, प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक पराग नवलकर, जिल्हा माहिती अधिकारी दिपक चव्हाण, पोलिस मुख्यालयाचे पो. नि. दशरथ हटकर, पत्रकार महेश देशपांडे आदींसह विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तपत्र छायाचित्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.