नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेवरील आयातशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सारखेचे घसरलेले दर, कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकर्यांना होणारा फटका यावर उपाय म्हणून केंद्राने हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. ठोक बाजारात साखरेचे दर घसरले होते. या दर घसरणीवर उतारा म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. आयातशुल्कात 50 टक्क्यांऐवजी 100 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून होत असलेल्या स्वस्त साखरेवर यामुळे मर्यादा येणार आहेत. याचा फायदा कारखानदारांना होणार आहे. त्याचबरोबर ऊसाला योग्य भाव देणंही कारखानदारांना शक्य होईल.
साखरेवरील आयातशुल्कात दुपटीने वाढ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
23:14
Rating: 5