श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील श्रीहरी सिंह रुग्णालयातच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. याच गोळीबाराच्या आड दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. यापैकी एक दहशतवादी पाकिस्तानचा असल्याचे समजते. ज्याचे नाव नावेद आहे. या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. 6 दहशतवादी कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जेलमधून रुग्णालयात आणले होते. आणि त्याच दरम्यान हा गोळीबार करण्यात आला आहे. श्रीनगरच्या श्री महाराजा हरी सिंह रुग्णालयातला हा प्रकार आहे. नवीद उर्फ अबू हंझला या लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याने पोलिसाच्या हातातून बंदूक हिस्कावून घेत गोळीबार केला. दहशतवादी अबू हंझला सध्या फरार आहे. या घटनेमुळे रुग्णालयात घबराट पसरली. हा हल्ला पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्यांच्या सहकारी दहशतवाद्यांना मुक्त करण्यासाठी करण्यात आला आहे. काही सशस्त्र दहशतवाद्यांनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला आणि गोळीबार सुरू केला. या गोळीबारा दरम्यान दहशतवाद्यांकडून अश्लिल भाषेत शिविगीळ करण्यात आली. गंभीर म्हणजे या दहशतवाद्यांसह अबू हंझलाही पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. दरम्यान, अचानक झालेल्या या गोळीबारामुळे रुग्णालयात एकच धावपळ झाली. ज्याचा फायदा घेऊन दोन दहशतवादी पसार झाले. या दहशतवादी हल्यानंतर येथील संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून फरारी दहशतवाद्यांचा सध्या कसून शोध सुरु आहे. तसेच रुग्णालय परिसरातही मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दोन दहशतवादी फरार एक पोलीस कर्मचारी शहीद
Reviewed by Dainik Lokmanthan
on
23:15
Rating: 5