नेवासा शहर प्रतिनिधी ;- पंचायत समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या मुक्ताई जॉंगिंग ट्रॅकचे उदघाटन {दि. २३} दुपारी ३ वाजता होणार आहे. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, आहारतज्ञ डॉ. शरयू कोरडे, उपसभापती राजनंदिनी मंडलिक, अँड. सोनल वाखुरे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प व पंचायत समिती नेवासा यांच्यावतीने किशोरवयीन मुली व महिलांना प्रशिक्षण, स्पर्धा परिक्षा, कायदेविषयक व आऱोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या सर्व विषयांचा महिलांच्य़ा जीवनात मोठा फायदा होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती गडाख यांनी केले.
मुक्ताई जॉगिंग ट्रॅकचे आज उदघाटन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:15
Rating: 5