Breaking News

रयतेच्या स्वराज्यासाठी बलिदान देणार्‍या मावळ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रात अमर मावळा ज्योत स्थापन करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्यासाठी बलिदान देणार्‍या मावळ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रात अमर मावळा ज्योत स्थापन करण्याची मागणी पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. याचा मुख्य उद्देश शेतकरी, कष्टकरी व प्रजेचा कल्याण हे होते. धर्म, पंथ व जातीपलीकडे जावून स्वराज्य उभारणीसाठी सर्व मावळे एकवटले. तर अनेक मोठ्या हुद्दयांवर शिवाजी महाराजांनी मुस्लिम सरदारांची नेमणुक केली. अनेक मुस्लिम मावळ्यांनी त्यांच्यासाठी बलिदान दिले. पुर्वी झालेले युध्द धर्मासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढले गेले. मात्र खरा इतिहास जाणिवपुर्वक लपविला जात आहे. शिवाजी महाराजांच्या खर्‍या इतिहासावर कॉ.गोविंद पानसरे यांनी प्रकाश टाकला त्याची किंमत त्यांना आपले प्राण गमवावून मोजावी लागल्याचे अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.
शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष राजे होते. महाराजांचा खरा इतिहास जनतेपुढे येण्यासाठी व त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळण्यासाठी अमर मावळा ज्योत महाराष्ट्रात उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. दिल्लीत उभारण्यात आलेल्या अमर जवान ज्योतच्या धर्तीवर ही ज्योत उभारण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. स्वराज्याचे अभिमान बाळगणार्‍यांसाठी अमर मावळा ज्योत प्रेरक राहणार असून, स्वराज्यासाठी बलिदान देणार्‍यांची नांवे या स्मारकावर कोरली जाणार आहे. जाती धर्माच्या राजकारणावर लगाम लावण्यासाठी शिवाजी महाराजांचा खरा इतिहास घरा घरा पर्यंन्त घेवून जाण्याची गरज असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अमर मावळा ज्योत उभारणीसाठी कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, कॉ.महेबुब सय्यद, आर्किटेक अर्शद शेख, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, अशोक भोसले, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, वीरबहादुर प्रजापती आदि प्रयत्नशील आहे.