Breaking News

स्व. प्रा. लक्ष्मण उगलमुगले यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न


अक्षय मतिमंद विद्यालय शेवगावचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण उगलमुगले यांच्या स्मरणार्थ विद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज सबलस आणि ह.भ.प. झिरपे महाराज यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. देशपांडे हे होते. यावेळी त्यांनी रक्तदानाचेे महत्व पटवून सांगितले. दानाचे 83 प्रकार आहेत. त्यापैकी सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्त दान मानले जाते असे ह.भ.प. झिरपे महाराज यांनी मत व्यक्त केले. यावेळी डॉ. गोर्डे, रेणुका आव्हाड, भारती उगलमुगले यांनी हा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. आनंद ऋषीजी ब्लड बँकेचे सुनील महानोर यांनीही रक्तदान करणार्‍यांंचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक राम उगलमुगले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.