Breaking News

जिल्हा निर्मीती साठी अंबाजोगाईकर उतरणार रस्त्यावर

अंबाजोगाई :- महाराष्ट्रात अनेक जिल्ह्याची निर्मिती झाली.परंतु अंबाजोगाई जिल्हा निर्मिती प्रश्‍न गत तीस वर्षापासून तसाच रेंगाळत राहिला आहे. महाराष्ट्रात ज्या-ज्या वेळी इतर जिल्ह्यानिर्मिती किंवा आयुक्तालयाच्या निर्मितिची चर्चा होते त्याच वेळी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची चर्चा होते.बीड जिल्ह्याचे विभाजन होऊन अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी अशी मागणी तीस वर्षीपासून आहे.


15 ऑगस्ट1997 रोजी 150 जणांनी केलेल्या आंदोलनात काहींनी जेल सोबत मार देखील खाल्ला असल्याचे बोलले जात आहे.मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी जिल्हा निर्मिती प्रश्‍न तडीस जाणार नसून जनरेटा देखील आवश्यक आहे . अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी सोशल मीडियाद्वारे एकत्र येण्यासाठी पोस्ट टाकण्यात आल्यानंतर लागलीच नगरपालिका सभागृहात अंबाजोगाई शहरातील तसेच ग्रामीण भागातील, धारूर, केज ठिकाणचे नागरिक जिल्हा निर्मितीसाठी एकत्र आले व पुढील आंदोलनं कश्या प्रकारची झाली पाहिजे यावर व्यापक चर्चा झाली. यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. बैठकीत सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी एक जेष्ठ आणि युवकची सुकाणू समिती स्थापन करण्याचे ठरले असून बुधावरी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.साखळी उपोषण, निदर्शने, शिष्टमंडळ , आणि लोकशाही मार्गाने सर्वपक्षीय एकजुटीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा निश्‍चय अंबाजोगाई करांनी केला असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीत काँग्रेस नेते संजय दौड, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, अ र पटेल , उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, बबन लोमटे, डॉ सचिन काळे,राजेभाऊ औताडे, सोमनाथ धोत्रे, अनंत आरसुडे , रोहिदास हातागळे, महादेव गोरे, शंकर चव्हाण, अविनाश मूडेगावकर,धारूर राष्ट्रवादी ता अध्यक्ष ईश्‍वर मुंडे, जेष्ठ नेते बन्सी जोगदंड, शेकाप चे सौरभ संगेवर, भाजपचे उज्जैन बनसोडे, संजय गंभीरे, अमित जाजू, शिवसंग्राम चे सुनील अडसूळ, मनसे चे सुनील जगताप,लोकजनशक्ती चे राजेश वाहुळे, एमआयएम चे हाफिज , वकील संघा चे ऍड अण्णासाहेब लोमटे, जेष्ठ नागरिक संघा चे पवार, जेष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार , अमर देशमुख, दत्त सरवदे, प्रशात आदनाक, आम आदमी चे मनोज इंगळे, संजय साळवे, रविकिरण देशमुख,कुंबेफळ सरपंच गणेश भोसले , अंबासाखर व्हा. चेअरमन हनुमंत मोरे ,वसंत शिंपले यांच्या सह विविध पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी वा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


शहराच्या मध्यभागी मोंढ्या त मेन रोड वर जिल्हा निर्मितीच्या आंदोलन च्या समनव्यय साठी कार्यालय देण्यात आले.महसूल मंत्री यांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाचे संकेत दिल्यानंतर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची चर्चा सुरू होऊन प्रश्‍न ऐरणीवर आला.भौगोलिक दृष्ट्या बीड जिल्हा मोठा असल्याने प्रशासकीय दृष्ट्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अंबाजोगाई जिल्हा निर्मिती मागणी जनतेतून मोठ्या प्रमाणावर पुढे आली आहे. नव्वद च्या दशकात जिल्हा निर्मितीच्या मागणी साठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले होते. राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्‍वासन दिले होते. युती सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, आघाडी सरकारचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही अंबाजोगाई जिल्हा झालाच समजा असे आश्‍वासन दिले होते . स्व विमलताई मुंदडा यांनी जिल्हा निर्मिती साठी विशेष प्रयत्न केले. मात्र जिल्हा निर्मिती घोषणा तशीच राहिली. 

मराठवाड्यात औरंगाबाद नंतर दुसरे विभागीय आयुक्तालय निर्मिती च्या वेळीही अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची शक्यता होती. मात्र आयुक्तालय लातूर की नांदेड हा वाद न्यायालया पर्यंत ताणला गेला. आयुक्तालय प्रश्‍न रेंगाळला आणि अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा ही अनिर्णित राहिला. आघाडी सरकार गेले. स्व विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर अपेक्षाच राहिली नव्हती . 

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणी नंतर ची मागणी असणारा हिंगोली, वाशीम, गोंदिया, पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली . अंबाजोगाई जिल्ह्याची घोषणा नाही झाली. फडणवीस सरकारने छोट्या जिल्हा निर्मिती साठी प्रयत्नरत असल्याचे धोरण स्पष्ट होत असताना अंबाजोगाई जिल्हा घोषणा होईल अशी अंबाजोगाईच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.इतर प्रस्तावित जिल्ह्यापेक्षा अंबाजोगाई जिल्हा निर्मिती सोपी आहे.अंबाजोगाई जिल्हा निर्मिती साठी आवश्यक असणारी सर्व शासकीय कार्यालयाची इमारती तयार स्थितीत आहेत. अतिरिक्त स्तरचे काही अधिकारी ही कार्यरत आहेत. अंबाजोगाई जिल्हा निर्मिती झाल्यास प्रशासकीय दृष्ट्या सोईचे होईल हे नक्की!

स्व.विमलताई मुंदडा मंत्री असताना त्यांच्या विशेष प्रयत्नातून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती साठी आवश्यक असणारे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, भूसंपादन कार्यालय, अ तिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय झाली.परंतु अंबाजोगाई जिल्हा घोषणा तशीच राहिली.
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी 1997 च्या आंदोलनात अण्णासाहेब लोमटे, कै. अरूण मामा पुजारी, राजकिशोर मोदी, राजेसाहेब देशमुख, बबन लोमटे, संजय दौंड, शेख रहीम, किशोर गिरवलकर,बन्सी जोगदंड यांच्यासह 150 जणांनी सहभाग घेतला होता.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीत रेणापूर, परळी, अंबाजोगाई, केज, धारूर, माजलगाव या सहा तालुक्याचा समावेश असून 716 गावे असणार आहेत.