थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करणार- महावितरण
महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून थकबाकी वसुलीसाठी येथील अधीक्षक अभियंता कार्यालयाला सक्त सूचना प्राप्त झाल्या आहेत. थकबाकी न भरल्यास संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 1 फेब्रुवारी 2018 पासून सर्व वर्गवारीतील थकबाकीदार वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे अधीक्षक अभियंता चंदशेखर पाटील यांनी सांगितले. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील ज्या 512 वीज ग्राहकांनी 22 फे ब्रुवारीपर्यंत वीज देयक भरले नाहीत, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील पाच, तर आचरा विभागातील तीन पाणीपुरवठा योजनांकडे थकबाकी असल्याने त्यांना वारंवार कल्पना देऊन वीज देयक भरण्याच्या सूचना देऊनही वीज देयक न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
