नेवासा/ प्रतिनिधी /- उस्थळदुमाला व चांदगावच्या जिव्हाळ्याचा व प्रलंबित असलेला डी. वाय.२ चारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. अशी ग्वाही आमदार मुरकुटे यांनी यावेळी बोलतांना दिली.नेवासा तालुक्यातील चांदगाव नवे तसेच उस्थळदुमाला येथे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे ४६ लाख रुपये खर्चाच्या रस्ते व सभामंडप या कामांचा शुभारंभ आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते रविवार दि.४ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. उस्थळदुमाला-चांदगाव येथील नियोजि लक्ष्मीमाता सभामंडप, समाज मंदिर तसेच रस्त्यांचे भूमिपूजन यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चांदगाव ग्रामपंचायत प्रांगणात झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भदगले, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, माजी सरपंच दादासाहेब वाघ, सोसायटीचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, उपसरपंच दादासाहेब वाघ, रामराव भदगले, हभप विष्णुदास सांगळे महाराज, जेष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ सुकाळकर, कुंडलीकराव चिंधे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सुनील नरसाळे, सरपंच सिंधू उंदरे,पाटबंधारे विभागाचे अभियंता थोरात, भानसहिवऱ्याचे सरपंच देविदास साळुंके, जनार्धन जाधव, प्रताप चिंधे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा चिटणीस नामदेव खंडागळे गुरुजी हे होते.
आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:15
Rating: 5