दोन मजुरांचा मृत्यू
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी शिवारातील तापी काठावरील माती खोदकाम करणार्या मजुरांच्या अंगावर मातीची कराड कोसळल्याने माती खाली दबले जाऊन 2 मजुर जागीच ठार झाले. तर 2 मजूर जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास घडली. घटनेत चिंतामण देवीदास म्हसाने (वय 30) व दीपक दगडू म्हसाने (वय 22 दोघे रा. वरोली ता. जिल्हा ब-हाणपूर) हे जागीच ठार झाले. तर मनोज गणेश सोनवणे (वय 20) व गजानन जाधव (वय 20) हे दोघे जखमी झाले आहेत