Breaking News

लहान मुलांसाठी बालआधार कार्ड !


नवी दिल्ली : मोठ्यांसोबत आता लहानग्यांनाही आधार कार्ड लागू होणार आहे. लहान मुलांसाठी बाल आधार कार्ड जारी करण्यात येणार असल्याची माहिती यूआयडीएआयनं टि ्वटरव्दारे दिली आहे. हे बाल आधार कार्ड निळ्या रंगाचं असणार आहे. सरकारी सेवेचा लाभ घेण्यासाठी ओळखीचा दाखला म्हणून केंद्र सरकारनं आधारला मान्यता दिली आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वय असणार्‍या मुलांचे आधार बनवताना आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचा आधार नंबर तसेच मुलाच्या जन्माचा दाखला आवश्यक आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकाचे आधार बनवण्यासाठी बायोमॅट्रिक तपशीलाची गरज भासणार नसल्याचंही ‘यूआयडीएआय’ने स्पष्ट केले आहे.