Breaking News

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात


वरूर / प्रतिनिधी :- शेवगाव तालुक्यामध्ये जगत्गुरु संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 641 वी जयंती उत्साहात पार पडली, शहरातील क्रांती चौंकामध्ये गुरु रोहिदास महाराजांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सकाळी 9 वाजता पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली, यावेळी मंचावर संजू फडके, अरुण लांडे, चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गुजर, तालुकाध्यक्ष गोरख वाघमारे, टायगर फोर्सचे किसन चव्हाण, जि. प. सदस्या हर्षदा काकडे व शहरातील सर्व पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते, यावेळी बोलताना घुले म्हणाले की, आज सर्व समाजाला संत रविदास महाराजांच्या विचारांची गरज आहे, कारण गुरू रविदास हे सर्व समाजाचे गुरू होते, महाराजांनी सर्व समाज एकत्र करण्याचे काम केले. त्याचबरोबर दिवसभर विविध कार्यक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी डॉ. रोहिदास उदमले यांचे संत रोहिदास चरित्रपर व्याख्यान झाले, यावेळी त्यांनी रोहिदास महाराजांचा जीवनपट उलगडून दाखवला, तसेच त्यांचे सामाजिक कार्य याची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उद्धव गुजर, दिनेश तेलोरे, दादा पाचरणे, भाऊसाहेब भाग्यवंत, सोनल वाघमारे यांनी परिश्रम घेतले, दक्षता समितीचे सदस्य अशोक शेवाळे यांनी सूत्रसंचालन तर तालुकाध्यक्ष गोरख वाघमारे यांनी आभार मानले.