Breaking News

आंदोलनानंतर शेवगाव नगरपरिषदेचे 96 कर्मचारी कामावर !


मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला मोठे यश प्राप्त झाले. सेवा खंडित केलेले 96 कर्मचार्‍यांना शेवगाव नगर परिषदेने पुन्हा कामावर रुजू केले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसापासुन शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांचे शेवगांव तहसील कार्यालयावर धरणे अंदोलन चालू होते. त्यातून काही केल्या मार्ग निघण्यास तयार नव्हता, तसतसे कर्मच्यारी आक्रमक होत होते.

 या अंदोलनाला विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी भेटी दिल्या व मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भारतीय कम्युनिस्ट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने विशेष प्रयत्न केले. कामगारांचा प्रश्‍न प्रामुख्याने न्याय हक्काने मार्गी लावला. यावेळी पवन साळवे, कॉम्रेड संजय नांगरे, विजय बोरुडे, सतीश लांडे, हरिष भारदे, अ‍ॅड. अविनाश मगरे, एजाज काझी, सुधाकर देहाडराय, सुनील आहुजा, राहुल मगरे, कामगार प्रतिनिधी सारिका छजलाणी, भाऊसाहेब मगर, अनिल मोहिते, अनिल लांडे, आशोक आहेर, अरूण मगर सह 96 कर्मचारी या आंदोलनास उपस्थित होते.