खमक्या अधिकार्यांची मनपाला गरज !
अहमदनगर/प्रतिनिधी। महानगपालिकेत सध्या संवाद जास्त आणि सुसंवाद कमी होत चालला असून, महापालिकेतील अधिकार्यांनाही कोणी येवून दमदाटी अथवा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचे आपण पाहिलेच आहे. परंतु या सर्वांचा परिणाम आता कामकाजावर होताना दिसत आहे. सत्ता कुणाची आणि विरोधक कोण हे काहीच समजत नसल्याचे चित्र मनपात पहावयास मिळत आहे. मनपातील सर्वांचे खोटारडे बुरखे फाडण्यासाठी मनपाला खमक्या अधिकार्याची प्रतिक्षा आहे.
मनपात सध्या ‘हम करे सो कायदा’ असेच राज्य सुरु आहे. याला आवर घातला नाही तर भविष्यात कोणतीच सुविधा नगरकरांना मिळणार नाही हे मात्र निश्चित.अनेकदा बोलले जाते की विकासाच्या आड राजकारण आणू नये. मात्र विकास कुणाचा आणि कोण करणार हा देखील शहरातील नागरिकांना सध्या पडलेला प्रश्न आहे. नगरपालिका होती तेव्हा विकास होत नाही त्याला कारणे होती. मात्र आता विकासाची गंगा वाहत असतानाही विकास का खुंटला जात आहे हे कुणालाच कळेनासे झाले आहे. नगरचे स्वच्छ नगर, सुंदर नगर ची कल्पनाच सध्या हरवली आहे. खड्डेमुक्तीचे नारे दिले जातात मात्र अस्तित्वात काहीच येत नाही. खड्डे मुक्त म्हटले तरी खड्ड्यांचा अडथळा दुर झालेला नाही. सत्ताधार्यांनी आणि विरोधकांनी विकासाच्या कामावर चर्चा करणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. मात्र मनपात टक्केवारीचा खेळ जोरात सुरू असल्याने ‘विकास’ कुणाचा आणि ‘प्रकाश’ कोणाच्या दारात हे आता कुणा ज्योतिष्याने नगरकरांना सांगण्याची गरज नाही हे पक्के आहे.
विकासाच्या नावावर जर विकास झालाच नाही तर बिले निघत असतील तर ‘प्रकाश’ कुणाच्या घरात पडला आहे हे आता समजुन चुकले आहे. ज्यांच्या घरात पथदिव्यांचा प्रकाश पडला आहे अशा प्रवृत्तींना ठेचुन काढल्याशिवाय आता नगरकर शांत बसणार नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अांधळ दळतय आणि कुत्र पिठ खातयं अशीच काहीशी परिस्थिती आपल्या महानगरपालिकेची झालेली आहे.
महानगरपालिकेला सक्षम अधिकारी मिळत नाही याचे कारणच हे आहे की येथील राजकारण असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, राजकारण्यांनी आता तरी नगरकरांच्या हितासाठी काम करणे गरजेचे आहे. आणि नगकरांनीही कोणाच्याही आमिषाला बळी न पडता आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी कंबर कसने गरजेेचे आहे. महानगरपालिकेत जर 40 लाखांचे बिले ही बिनदिक्कत काढली जात असेल तरी याची जबाबदारी कुणाची आणि कोण याला जबाबदार आहे याचे उत्तर लवकरच नगरकरांना मिळेल यात शंका नाही. बिले कुणी काढली, फाईली कुणी नेल्या, कुणी सह्या केल्या, कुणी टेंडरला सपोर्ट केला आणि कुणाी त्याला विरोध केला या सर्व बाबी स्पष्ट असल्यातरी यात नाहक कोणी बळी जावू नये हीच अपेक्षा. नगरच्या राजकारणात अनेक अधिकारी आपली एकतर बदली करुन घेतात, नाहीतर स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग अवलंबतात. अधिकारी सक्षम आला तर आंदोलनाच्या माध्यमातुन त्या अधिकार्यांला जेरीस आणायचे आणि विकासाच्या नावाने बोंबा मारायच्या.
आज ज्यांना निवडुन दिले त्यांना मनपामध्ये आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर निश्चितच आपले लोकप्रतिनिधी कसे आहेत याचा अंदाज बांधता येतो. लोकप्रतिनिधींचेे अधिकारी ऐकत नाही का अधिकार्यांना त्रास देण्याच्या हेतुने प्रतिनिधी आंदोलने करतात याचाही विचार होणे गरजेचे आहे. शहरातील पाणी योजना, नळ योजना, सक्षम वसुली यंत्रणा, ड्रेनेज लाईन, मूलभूत इतर प्रश्न प्रलंबित असताना महानगरपालिका झाल्या पासून राजकारण आणि फक्त राजकरणच केले जात आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर येत्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पुन्हा बहुमत मिळणार नाही आणि विकास सोडा आपसातील वादातुन शहर बकाल झाल्या शिवाय राहणार नाही हे आता प्रतिनिधींनी ओळखून भविष्यात योग्य ती पावले उचलावीत हीच अपेक्षा.