Breaking News

देशाच्या अखंडतेसाठी एन.एन. व्होरा यांचे मोलाचे योगदान - नितीन गडकरी


अशांत जम्मू-काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जम्मू-कश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून देशाच्या अखंडतेसाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे,असे गौरवोद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये आज पुणे येथील सरहद संस्थेच्या वतीने आयोजित 15 व्या ‘संत नामदेव पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. यावेळी श्री. गडकरी आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते जम्मू- कश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांना संत नामदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,दैनिक पंजाब केसरीचे मुख्य संपादक विजय चोपडा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यावेळी मंचावर उपस्थित होते. पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.