नगरपालिकेची सभा गाजली
पाथर्डी: प्रतिनिधी ;- मोकळे भूखंड, मुख्याधिकारी शिवजयंतीला अनुपस्थित, शहरातील हायमॅक्स या प्रश्नावर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गाजली. नेहमीप्रमाणे मुख्याधिकारी सभेला अनुपस्थित होत्या. पाथर्डी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष डॉ. मृत्यूजय गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी {दि. २२} सकाळी पार पडली. या सभेत १९ विषय घेण्यात आले.
सभेच्या सुरवातीला नगरसेविका दीपाली बंग यांनी महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबदल अपशब्द वापरणाऱ्या भाजपाचा पदच्युत उपमहापौर श्रीपाद चिंदम याचा नगरपालिकेच्यावतीने निषेध केला. मुख्याधिकारी या शिवजयंतीला अनुपस्थित असल्याने त्याना बडतर्फ करण्यात यावे, यासंबंधीचा ठराव घेण्यात यावा व तो ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तात्काळ पाठवण्यात यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी मागील काही महिन्यांपासून जायकवाडी धरणात मुबलक प्रमाणात पाणी असुनसुद्धा नागरिकाचे पाण्यासाठी हाल झाले आहेत. एक महिन्यावर उन्हाळा येऊन ठेपला आहे तरी येणाऱ्या उन्हाळ्यात पाणीपुरवठा विभागाने योग्य नियोजन करून शहरातील जनेतेचे पाण्यासाठी हाल होणार नाहीत, याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी सूचना मांडली. नगरसेवक महेश बोरुडे यांनी शहरातील ओपन स्पेस किती आहेत, यांची विचारणा करत त्याचे सभागृहासमोर वाचन करण्याची मागणी केली. शहारातील फुलचंद भागचंद गुगळे यांनी नगरपालिका हद्दीतील ५ गुंठे ओपन स्पेस नगरपालिकेच्या नावावर करून घेण्यासाठी दि. १२ जानेवारी रोजी अर्ज केला होता. परंतु अद्यापपर्यंत त्यावर पुढे कुठलीही प्रोसेस झाली नाही, अशी तक्रार केली. नगरसेविका मंगला कोकाटे यांनी पालिकेच्या कोणत्याच समितीची बैठक होत नसल्याची खंत व्यक्त करत राजीनामा देण्याचा इशारा दिला. गटनेते नंदकुमार शेळके, प्रविण राजगुरू, रमेश गोरे, अनिल बोरुडे, शारदा हंडाळ, सविता भापकर, सुनिता बुचकुल, सविता डोमकावळे आदी नगरसेवक सभेला उपस्थित होते. उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक नामदेव लबडे अनुपस्थित होते.
