शिरूरमध्ये दोन वृद्धांचा खून
पुणे : शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे वृद्ध महिला आणि पुरुषाचा अज्ञात मारेकर्यांने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना श निवारी मध्यरात्री घडली असून, रविवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या महितीनुसार, अज्ञात मारेकर्यांने खून करून घराला बाहेरून कुलूप लावले. त्यामुळे शेजार्यांचे लक्ष गेले नाही. परंतु दिवसभर घर बंद असल्याने शेजार्यांना शंका आली आणि त्यांनी ही माहिती पोलिसांना कळवली. रविवारी मध्यरात्री अकराच्या सुमारास ही घटना उघड झाली. किसन सुलेमान लोंढे (वय 60) व वत्सलाबाई पोपट माने (वय 70) अशी खून झालेल्या वृद्धांची नावे आहेत.