Breaking News

पंतप्रधान मोदींचा 3 देशांचा दौरा या मुस्लीम देशात करणार मंदिराचं भूमीपूजन.


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या परदेश दौर्‍यासाठी शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीहून रवाना झालेत. यूएई, ओमान आणि फिलिस्तानचा ते दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचा हा चार दिवसांचा दौरा असून, यामध्ये फिलीस्तीनला जाणे हा मोठा कार्यक्रम आहे. कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला फिलीस्तीन दौरा आहे. काही दिवसांपूर्वीच इस्राईल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौर्‍यावर आले होते.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, भारतासाठी पश्‍चिम आशिया प्रमुख प्राथमिकतेचे क्षेत्र आहे. या दौर्‍याचा हेतू संबंध सुधारण्यासाठी असून, 2015 नंतर आखाती आणि पश्‍चिम आशियातील देशाचा हा त्यांचा पाचवा दौरा आहे. 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ते या देशांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, ‘आमच्या वैश्‍विक क ार्यभारात या क्षेत्राला प्राथमिकता दिली गेली आहे. आपले या देशांसोबत वेगवेगळ्या कारणांसाठी संबंध आहेत. पंतप्रधान मोदी यांनी पुढे म्हटले की, मी या दौर्‍यात भारत आणि पश्‍चिम आशिया तसेच आखाती देशांच्या वाढत्या संबंधासाठी आणि ते मजबूत करण्यासाठी कटीबद्ध आहे. तसेच 11 फेब्रवारीला यूएईच्या शहीद स्मारकाला भेट देणार आहेत. तेथे एका सामुदायिक कार्यक्रमात ते भाग घेतील. एका हिंदू मंदिरचा पाया ठेवण्याचा देखील एक कार्यक्रम आहे. मागच्या दौर्‍यात मोदींनी येथे एक मंदिर बनवण्याचा विषय घेतला होता तेव्हा तेथील शासकाने यावर लक्ष देणार असल्याचे म्हटले होते.