Breaking News

22 भारतीय खलाशी सुखरूप

नवी दिल्ली : पश्‍चिम अफ्रिकेच्या बेनान समुद्र किनाऱयावरून अपहरण झालेल्या जहाजाची मंगळवारी अखेर सुखरूप सुटका झाली असून या जहाजावर असलेले सर्व 22 भारतीय कर्मचारी सुखरूप आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून त्याबद्दलची माहिती दिली आहे. एमटी मरीन एक्सप्रेस नावाचे हे जहाज गॅसऑइल वाहुन नेत होते. रविवारी हे जहाज बेनिनच्या समुद्रात गायब झाले होते. जहाजाचा संपर्क तुटला तेव्हा हे जहाज बेनिनच्या कोटोनाउ येथे होते. त्यामुळे बेनिन आणि नायजेरियनच्या अधिका़र्‍यांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आणि तटरक्षक दलानेही त्या जहाजाचा शोध सुरू केला. 22कर्मचा़र्‍यांना घेऊन जाणा़र्‍या या जहाजाची सुटका झाली असून हे सांगताना मला अभिमान वाटतो. नायजेरिया आणि बेनिन सरकारने मदत आणि सहकार्य केल्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो, असे ट्विट सुषमा स्वराज यांनी केले आहे.